डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोडला असलेल्या पामस् वॉटर रिसॉर्टमध्ये चोरट्यांनी तेथील कार्यालय फोडले. या कार्यालयाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा आत घुसलेल्या चोरट्यांनी रिसेप्शन व बॅक ऑफिसच्या कांऊटरमधील १ लाख ७० हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या संदर्भात रिसॉर्टचे मॅनेजर तुषार शरद शिर्के (40) यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी फौजदार किरण भिसे अधिक तपास करत आहेत.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *