डोंबिवली : डोंबिवली जवळील खोणी गावातील हायप्रोफाईल सोसायटी येथे ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खोणी पलावा परिसरातील जागरूक नागरिकांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली असून आर्शद करार खान (वय २८) आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद (वय २८) या दोघांची नावे आहेत. दरम्यान यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणली ? कोणास विक्री करण्यास आणली ? हे अद्याप समजलेले नाही. तर याबाबत पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे.
डोंबिवलीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी दोघांना पकडले आहे. या दोघांकडे ड्रग्स आणि रोख रक्कम सापडल्याने खोणी-पलावा सारख्या हाय प्रोफाइल परिसरात एकच खळबळ माजली असून आर्शद करार खान (वय २८) आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद (वय २८) या दोघांची नावे आहेत.या दोघांकडून २,३२,००० रू किमतीची ५८ ग्रम वजनाची एम.डी.पावडर , होंडा सिबीआर मोटार सायकल, दोन मोबाईल फोन आणि २,२३, ४०४ रू रोख रक्कम असा एकुण ५,३०, ४४० / – रू किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपी आर्शद करार खान हा सराईत गुन्हेगार असून ठाणे आणि नवीमुंबई येथे गुन्हे दाखल आहेत.