कल्याण दि.9 ऑगस्ट : एका २९ वर्षीय महिलेची जुळी गर्भपाताची (Twins Scar Ectopic Pregnancy)  प्रक्रिया नुकतीच कल्याणात पार पडली. मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नविन नाही. मात्र कल्याणात अशा प्रकारच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे ही कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने मोठे आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान मोरया हॉस्पिटलच्या प्रमूख स्त्रीरोग तज्ञ डॉ. शीतल गवांदे आणि त्यांच्या टीमने स्वीकारून अतिशय दुर्मिळ आणि अवघड किचकट प्रक्रिया यशस्वीपणे करून दाखवली आहे. 

डॉ. शीतल गवांदे

कल्यण पश्चिमेतील  मोरया रुग्णालयात  २९ वर्षीय गर्भवती महिला उपचारासाठी आली होती. सोनोग्राफी तपासणीत संबंधित महिला ही जुळी परंतु दुर्मिळ स्कार एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंट असल्याचे आढळून आले. या अत्यंत दुर्मिळ प्रकारात गर्भपिशवीमध्ये गर्भ न राहता यापूर्वी झालेल्या सिझरिंगच्या जखमेवर/ टाक्यांवर हे गर्भ रुतून बसतात. त्याला वैद्यकीय भाषेत एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसी असे संबोधले जात असल्याची माहिती डॉ. शीतल गवांदे यांनी दिली. या प्रकारात गर्भपात करणे हे संबंधित रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत अवघड असते. कधी कधी अशा प्रकारचे गर्भपात करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

लाखो रुग्णांमध्ये एखादाच रुग्ण

वैद्यकीय क्षेत्रात सुमारे १५ ते २० लाख रुग्णांमध्ये एखादा असा  एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसीचा रुग्ण आढळून येतो. मात्र त्यानंतरही डॉ. शीतल गवांदे, डॉ. शैलेंद्र जाधव, डॉ. जितेंद्र बोबडे, डॉ. शाहीस्ता खान, डॉ. मधुरा मोहनालकर आणि  संपूर्ण टीमने अत्यंत कौशल्याने ही किचकट वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली. आणि त्यासोबतच कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. मात्र या साठी मुंबईला जाण्याची गरज नाही. आता  कल्याणात आणि तोही माफक दरांत हा पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे लोकांच्या वेळेसोबत पैशांचीही बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *