मुंबई – बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अवघ्या वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे हॉर्टअॅटक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मनाला चटका लावणा-या या बातमीन सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. सिध्दार्थ सोशल मिडीयावर सक्रीय होतो. सिध्दार्थचे ट्वीटरवर १ मिलियन तर इन्स्टाग्रामवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सिध्दार्थच्या निधनानंतर सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्ट, फोटो व्हायरल होत आहे.
छोट्या पडद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. सिद्धार्थ शुक्ला यांने टीव्ही मालिकांमध्ये अगदी कमी वेळात स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले होते. सिद्धार्थने २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन ना’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. लव्ह यू जिंदगी, बालिका वधू आणि दिल से दिल तक या मालिकेमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी आणि बिग बॉस १३ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.
https://www.instagram.com/p/CS8nUTEijiP/?utm_medium=share_sheet
इंस्ट्रग्रामवर फ्रंटलाईन वर्करचे कौतूक …
२४ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ शुक्लाने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. त्यात त्याने लिहिले होते की, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.
शेवटचं ट्वीट, खेळाडूंच्या कौतूकाच ..
३० ऑगस्टला सिद्धार्थ शुक्लाने केलेलं ट्वीट त्याची अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरली. पॅरालिंपिकमध्ये अवनी लेखरा आणि सुमित अंतील यांनी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवल्यानंतर सिद्धार्थने ही पोस्ट लिहिली. भारतीयांची अभिनास्पद कामगिरी असं म्हणत या दोघांचं कौतुक त्याने केलं होतं. तसंच सुवर्ण पदकासोबत विश्व विक्रम केल्याचाही उल्लेख त्याने केला होता.
मृत्यूचं कारण अस्पष्ट ..
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिध्दार्थ शुक्लाचा परिचय ..
सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० साली मुंबईत झाला होता. त्याचे वडील अशोक शुक्ला हे रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये कामाला होते. तर आई रीता शुक्ला या गृहीनी आहेत. सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० साली मुंबईत झाला होता. त्याचे वडील अशोक शुक्ला हे रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये कामाला होते. तर आई रीता शुक्ला या गृहीनी आहेत. सिद्धार्थचे कुटुंब हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे (इलाहाबाद) आहेत. त्याने सेंट झेवियर्स हायस्कूल या शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केले. मॉडेल आणि जाहिराती क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अशी त्याने ओळख मिळवली.