ठाणे : ; दसरा सणाच्या मुहूर्तावर फुल मार्केट मध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ७ ऑक्टोबर नंतर सुरू झालेली मंदिर व उद्या असलेल्या दसरा सण या पार्श्वभूमीवर फुल मार्केट ग्राहकांनी अक्षरश गजबजून गेला होता. मुंबई नंतर कल्याण च्या फुल मार्केट मध्ये ठाणे जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी  येतात गणपती मध्ये फुलांना भाव कमी होते मात्र दसरा असल्याने फुलांचे भाव वाढले आहे सोशल डिस्टनसींग सोडाच पण बहुतांश नागरिकांना मास्क चा देखील विसर पडला होता  या ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे  दिसून आले  नागरिकांनी एकच गर्दी केल्याने एपीएमसी मार्केट च्या आजूबाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती . कल्याण पूर्वेतील नेतीवली नाका ते कल्याण  शिळरोड ते आग्रा रोड पर्यत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाल्याचे दिसून आलं  .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!