नो- एन्ट्रीत गाडी अडवल्याने, त्यांनी वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली 

कल्याण : नो एन्ट्रीत गाडी अडवल्याने त्या दुचाकीस्वारांनी चक्क वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जखमी केल्याचा प्रकार कल्याणात घडलाय. मात्र हा प्रकार अन्य वाहतूक पेालिसांनी पाहिल्यानंतर पळून जाणा-या त्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करून  वाहतूक पोलिसांनी त्यांना पकडल. शफाक शेख आणि दाऊद अन्सारी अशी या दोघांची नावं असून त्यांना महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली. तर दिनेश काटके असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

कल्याणातील सुभाष चौक परिसरात सोमवारी संध्याकाळच्यावेळी वाहतूक पोलीस दिनेश काटके हे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने दुचाकी आली. नो एन्ट्रीत गाडी शिरल्याने कटके यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र त्या दुचाकीस्वारांनी गाडी थेट कटके यांच्या अंगावर  घातली. यावेळी काटके हे खाली जमिनीवर पडून जखमी झाले. त्यानंतर हे  दुचाकीस्वार भरधाव वेगाने निघून गेले. काटके व अन्य  वाहतूक पोलिसांनी या दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. ट्राफिक असल्याने ते थांबले असतानाच काटके हे गाडीवरून उतरून त्यांना पकडण्यासाठी गेले असता त्यांनी त्यावेळीही काटके यांना जोरदार धक्का देत पळून गेले. त्यांनंतर त्यांचा पाठलाग केला असता पुष्पराज हॉटेल येथे ट्राफिकमध्ये अडकल्याने त्यांना पकडण्यात आले. त्या दुचाकीस्वारांना पेालिसांच्या स्वाधीन केले आहे अशी माहिती काटके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *