ठाणे : बदलापूर पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एमएमआरडीएकडे पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. अखेर वाहतूक पेालिसांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले. त्यामुळे एमएमआरडीएक अधिका-यांविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

कल्याण नजीक असलेल्या बदलापूर पाईपलाईन रोड हा रस्ता कल्याणहुन नवी मुंबई, अंबरनाथ बदलापूर ,डोंबिवली कडे येण्या जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते .मात्र यंदाच्या पावसाळयात या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे . या खड्ड्यामुळे वाहनचालकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय .या रस्त्याच्या डागडुजीसाठी पोलिसांकडून अनेकदा एमएमआरडीए कडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरील खड्डयामुळे नागरिक त्रस्त आहेत .तर दुसरीकडे वाहतूक कोंडी सोडवता सोडवता वाहतूक पोलिसांची दमछाक होतेय अखेर आज पोलिसांनीच हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले, वाहतूक पोलीस अधिकारी शहाजी शिरोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चाने येथे रस्त्यावरील मोठं मोठे खड्डे बुजवले .खड्ड्यामुळे नागरिकांसह वाहतूक पोलिसांना देखील मनस्ताप सहन करावा लागत असल्याने एमएम आर डी ए प्रशासन आता तरी लक्ष देईल का ? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *