नवी मुंबईत तरूणाची वाहतूक पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई : नवी मुंबईतील कौपरखैरणे परिसरातील कांचन जंगा इमारतीजवळील रस्त्यावर वाहतूक पोलीस तानाजी पाटील हे डयुटीवर असतानाच दानिश इब्राहिम शेख तरूणाने त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय त्यावेळी त्याच्यासोबत एक तरूणीही होती. दानिशचा वाहतूक पोलिसाशी वाद झाला होता त्यावेळी त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली हा प्रकार बुधवारी रात्री घडला मात्र ही घटना कॅमे-यात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तरूणाला अटक केल्यांनतर त्याला सोडून देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच कल्याणात महिला पोलीस अधिका-याने एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *