अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष केदारजी लखेपुरीया यांच्या नेतृत्वात अँड मनोज बोईनवाड यांची अखिल भारतीय कोळी समाज युवा अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती निवड करण्यात आली. त्या प्रसंगी अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रत्यक्ष मराठवाडयातील छत्रपती संभाजी नगर येथे एकदिवशी संवाद दौरा करत युवा प्रदेशाध्यक्ष यांचा नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भ, खान्देशसह मराठवाडयातील जातीच्या प्रमाणपत्रासह व्हॅलिडीटीचा प्रश्न गंभीर बनला आहे, मात्र, या जात प्रमाणापत्रासह समाजातील तरूणांना रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारी वाढत असल्याने तरूण पीढीमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोळी समाजातील जात प्रमाणपत्रासह समाजातील तरूण पिढीच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष केदारजी लखेपुरीया यांनी घेतला.

मराठवाडयातील तरूणांच्या समस्या जाणून घेण्याची युवा प्रदेशाध्यक्ष अँड मनोज बोईनवाड यांच्या नेतृत्वात नव तरूणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी बैठकाचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम सिल्लोड येथे सपकाळवाडी येथे समाज बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या यावेळी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने जाणून घेऊन तरूणांच्या शैक्षणिक उच्चांकाचा विचार करून त्यांच्यासाठी रोजगार निमिर्ती उपलब्ध करण्यासाठी निर्धार अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा असल्याने त्यांसंदर्भात अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सरचिटणीस अॅड. सचिन ठाणेकर यांनी घेतला असल्याने ”कोळी चेंबर्स ऑफ कामर्स”ची रचना महाराष्ट्रात प्रांतवार रचना करण्याची पुढची रणनिती आखण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ”अखिल भारतीय कोळी समाज आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष केदारजी लखेपुरीया यांनी प्रत्यक्ष भेट देवून अखिल भारतीय कोळी समाजाच्या टीमसह, नव्या तरूण युवा प्रदेशाध्यक्ष अॅड मनोज बोईनवाड यांच्या नेतृत्वात समस्या व अडचणी समजून घेतल्या यावेळी उपस्थित समाज बांधवांनी मोठया प्रमाणात हर्षोउल्हासात अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा सत्कार करण्यात आला.

साहेबराव दाडगे, संदीप सपकाळ, रंजित सपकाळ, अध्तय सपकाळ, अभिषेक दांडगे, वैभव सपकाळ, अजय सपकाळ, विजय मोरे, संदिप गवळे, समाधान सपकाळ, गजानन मोरे, किसन सपकाळ, राजु सपकाळ, भिका सपकाळ, अॅड सुनिल सपकाळ, लक्ष्मण सपकाळ, गणेश सैवर, किसन सपकाळ, बी.वाय.सपकाळ, रत्नाकर पाडळे, राजुभाऊ सपकाळ, लक्ष्मण सपकाळ, डॉ. गणेश सपकाळ, देवराज सपकाळ, राजकुमार भोटकर, अशोक सपकाळ, सोमनाथ सपकाळ, विलास सपकाळ, सुखदेव सपकाळ, रंगराव बावस्कर, दिलीप सपकाळ, कचरू सपकाळ, संजय भोपटकर,अअनिल सपकाळ, संदीप आर के, बाजिराव गवळी, अजय सपकाळ, लक्ष्मण तायडे, रमेश सपकाळ, अॅड सुनिल सपकाळ, मनोज शिदे, रामचंद्र सपकाळ, समाधान सपकाळ, बंटी सपकाळ, निलेश सपकाळ तसेच अखिल भारतीय कोळी समाजाचे केदारजी एस लखेपुरीया साहेब-अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य प्रदेश आणि राष्ट्रीय सदस्य, डाँ. हरिष रामआसरे कोरी साहेब-उपाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश, पराग परशुराम पाटील साहेब- उपाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश, दिनेश अनंत कोळी साहेब- उपाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश, ओमगशद बा. बोईनवाड साहेब, युवा अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश, अजिंक्य दिपक पाटील साहेब- युवा सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश, जयवंत नारोलीया साहेब-सचिव – ठाणे जिल्हा, दिनेश रविंद्र भगत साहेब- युवा अध्यक्ष -ठाणे जिल्हा, नितेश धनाजी पाटील- युवा अध्यक्ष – नवी मुबंई आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *