कल्याण : रस्त्यावरील खड्डयांवरून मुंबई ठाण्यातील वातावरण तापलं असतानाच आता केडीएमसीने खड्डयांची तक्रार नोंदविण्यसाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी खडडयांच्या तक्रारी 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविता येणार आहे.

Citizen Effect : अखेर बिटकॉन इंडिया डेव्हलपर्सला १० लाखाचा दंड

गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे/ रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, महानगरपालिकेने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी वरील टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी केले आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आमदार राजू पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!