मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई : रेल्वे रूळाच्या दुरूस्ती व देखभालीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४ .२० दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील जलद मार्गावर हा मेगाब्लॉक आहे मेगाब्लॉक दरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल ठाण्यानंतर डाऊन धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्याम हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.सीएसटी येथून पनवेल आणि अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *