नोटबंदीच्या समर्थनार्थ डोंबिवलीत रिपब्लिकन पक्षातर्फे व्हाईट डे
डोंबिवली : नोटबंदीला आज एक वर्षे पूर्ण झाल्याने त्या समर्थनाथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे देशभरात व्हाईट डे पाळण्यात आला. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार डोंबिवली शहरात व्हाईट डे पाळण्यात आला. रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून व्हाईट डे पाळण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतीकारी पाऊल उचलीत आठ नोव्हेंबरला देशात नोटाबंदी लागू झाली. आजच्या दिवशी त्याला एक वर्षे पूर्ण होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतीकारी पाऊल उचलल्याबद्दल समर्थन दिले आहे. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा काळया पैशाविरोधात आणि देशाचा हिताचा व क्रांतीकारी निर्णय आहे त्यामुळे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देशभरात व्हाईट डे पाळण्याचे आवाहन रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकत्यांना केले आहे. त्यानुसारच डोंबिवली रिपाइंच्या वतीनेही व्हाईट डे पाळला जाणार आहे. नोटबंदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काळया पैशाच्या विरोधातील पाऊल होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून रिपाइंतर्फे व्हाईट डे पाळण्यात येत असल्याचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष किशोर मगरे, उपाध्यक्ष दिलीप काकडे, महिला शहर संघटक ज्योत्सना रोकडे, महेश येवले, शहर युवक आघाडी सचिव संजय मोहिते, समाधान तायडे , शहर संघटक विठ्ठल खेडकर, डोंबिवली पूर्व युवक आघाडी अध्यक्ष विश्वास समशेर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———–