हीच यांची ‘ बेस्ट ‘ नौटंकी   : आशिष शेलार यांचा शिवसेनेवर प्रहार 

मुंबई  :  बस भाड आणि पास वाढीवरून  भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी पून्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केलाय. भाजप सरकारचा नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय म्हणे जनविरोधी? आता स्वतः बेस्टची दरवाढ केली ते कामगार हित ? हीच यांची बेस्ट नौटंकी ? असा टोला  आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला  लागवलाय. बस भाडं आणि पास दरवाढीला बेस्ट समितीने मंजुरी दिल्याने मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार आहे याच पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विट करून सेनेवर हा प्रहार केलाय.

आर्थिक कचाट्यात सापडलेल्या बेस्टला सावरण्यासाठी बेस्ट प्रशासनाने तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. काल बेस्ट समितीकडून याला  मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटावर एक ते 12 रुपये आणि मासिक पासासाठी प्रवाश्यांना 40 ते 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासातील दरवाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी असणार आहे. शिवसेना भाजप राज्यात सत्तेत एकत्रित   असली तरी सुद्धा मुंबई महापालिकेत भाजप पहारेकरी च्या भूमिकेत आहे. त्यामुळे  सेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. शेलार यांच्या टोल्याला सेना नेते काय उत्तर देतात याकडं आता लक्ष वेधलय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!