ठाणे : ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना सन २०२० -२०२१ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये १५ हजार ५०० इतके सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज केली.

या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या काळात घटलेले उत्पन्न त्यामुळे महापालिका ठाणे महापालिका आर्थिक संकटातून जात असतानाच निवडणुका डोळयासमोर ठेवून हे निर्णय घेतले जात असल्याची टीका केली जात आहे.

१६ कोटीचा बोजा
या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी ६,८८५ एकत्रित मानधनावरील कर्मचारी ३१४, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी ९७३ आणि परिवहन सेवेमधील १८९७ कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण १६ कोटी इतका खर्च होणार आहे. सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.

…………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *