ठाणे ( प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज नौपाडा प्रभाग समितीतंर्गत जांभळी नाका मुख्य भाजीपाला मार्केट, कळवा नाका, हाजुरी, जवाहरबाग येथील जवळपास २५० पेक्षा जास्त अनधिकृत हातगाड्यांवर व फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाच टेंपो सामानासह जप्त करण्यात आले तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या ११ दुकानांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

शहरातील हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व परिमंडळ उप आयुक आणि सहाय्यक आयुक्तांना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर नौपाडा प्रभाग समितीतंर्गत काल मध्यरात्री १ वाजल्यापासून ते सकाळी ९ या कालावधीत अनधिकृत हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जांभळी नाका मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, कळवा नाका, हाजुरी, जवाहरबाग येथील जवळपास २५० पेक्षा जास्त अनधिकृत हातगाड्यांवर व फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाच टेंपो सामानासह जप्त करण्यात आले. तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या ११ दुकानांवर कारवाई करण्यात आली. तसेच ७ हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या. सदरची कारवाई उप आयुक्त संदीप माळवी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निष्कासन पथकाच्या साहाय्याने केली.सदरची कारवाई लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून जे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!