राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले;पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई, दि. १५ मार्च – राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनात वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इत्यादी गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यावर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!