डोंबिवली : अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारे डोंबिवलीचे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी ७३ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. सलग २२ व्या वर्षी‌ प्रसिद्ध कलादिग्दर्शक  संजय शशिकांत धबडे हे टिळकनगरच्या बाप्पाची नेत्रदिपक सजावट साकारत आहेत. यावर्षीही त्यांनी साकारलेला रोमन गार्डनचा अल्हाददायक देखावा दोन वर्षांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारया भाविकांना मानसिक आनंद देत आहे.

 

सुयोग हाँलच्या प्रवेशव्दाराशी असलेल्या कृष्णकमळ व बोगनवेलींच्या कमानी, सजावटीत ठेवलेल्या शोभेच्या झाडांच्या ६० ते ७० कुंड्या आणि त्यामागील रोमन शैलीच्या वास्तू आणि संगितातून केलेली वातावरण निर्मिती यामुळे आपण एखाद्या बागेत फिरायला आल्याचाच आनंद भाविकांना मिळत आहे . बागेतील दोन कमानींचा भाविक सेल्फी पाँइंट सारखा उपयोग करत आहेत आणि येणारी कुटुंबे त्यासमोर वैयक्तिक आणि कौटुंबिक फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत …..

बाप्पांच्या दर्शनाचे आणि दि. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सत्यनारायणाच्या  महापूजेच्या तिर्थप्रसादाछा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  सुशिल भावे आणि उत्सव समिती प्रमुख  देवेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!