कल्याण : शाळेत जाण्याच्या बहाण्याने दुपारच्या सुमारास घरातुन तीन मुलं निघाली .मात्र रात्र उलटली तरी ती घरी परतली नाहीत .. कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र मुलं काही सापडली नाहीत.आज सकाळच्या सुमारास चिमुकल्यांच्या आई वडिलांनी महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठले .महात्मा फुले पोलिसांनी या तीन चिमुकल्यांच्या शोधासाठी पथके तयार केली . सीसीटीव्ही तपासले, कुटुंबाची चौकशी केली . अखेर पोलिसांना ही मुलं खडवली रेल्वे स्टेशन परिसरात सापडली आणि कुटुंबियांसह पोलिसांच्या जिवात जीव आला . मुलांची चौकशी केली आम्ही खडवली नदीत पोहण्यासाठी आलो असल्याचे सांगितले .सुदैवाने मुलांसोबत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही ..
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात विजय थोमर हे कुटुंबासह राहतात .त्यांना दोन मुली व दोन मुलं आहेत. चार ही मुलं लहान आहेत . त्यांची मुलं जोशीबाग परिसरातील एका शाळेत शिकतात. काल दुपारच्या सुमारास त्यांचे तीन मुलं शाळेत जातो असे सांगत घराच्या बाहेर पडली. ते सायंकाळ उलुटूनही घरी परतले नव्हती पालकांच्या तक्रारीनंतर या घटनेच्या गांभीर्य ओळखून डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील , पोलीस अधिकारी किरण भिसे, स्वाती जगताप ,सूचित टिकेकर ,रवींद्र हासे, सुमित मधाळे ,आनंद कांगरे यांच्या पथकाने शोध सुरू केला.
कल्याण शहरासह कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले . कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही तिन्ही मुलं आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसताना दिसून आली . पोलिसांनी एक पथक खडवलीच्या दिशेने रवाना झाले. खडवली स्टेशन परिसरात आज दुपारच्या सुमारास ही तिन्ही मुलं आढळून आली .. ही मुलं सापडल्याने पोलिसांसह कुटुंबियांच्या देखील जिवात जीव आलाय . ही तिने मुलं खडवली नदीत पोहण्यासाठी काल कुणालाही न सांगता खडवलीत आली होती. रात्रीच्या सुमारास या मुलांना परत येणे न जमल्याने ते रेल्वेस्थानक परिसरातच थांबून राहिले होते . सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी तत्काळ दुपारच्या सुमारास या मुलांना शोधून काढलं या तिन्ही मुलांना आज त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं आहे .
———
शिक्षिकेच्या घरात चोरी
डोंबिवली : एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली जीमखाना परिसरात राहणाऱ्या स्वाती पुष्कर आपटे या शिक्षिकेच्या घरातून 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत चोरीचा प्रकार घडला आहे. आपटे यांच्या घरातून 52 ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी फौजदार आर. वाय. चौगुले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विद्यार्थ्याला तरूणांची मारहाण
डोंबिवली : मागील भांडणाचा राग मनात धरून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याच्या जु्न्या मित्रांनी गुरूवारी मध्यरात्री येथील पश्चिमेतील सप्तशृंगी मंदिर रस्त्यावरील गोल्डन पार्क समोर बेदम मारहाण केली. ही मारहाण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या एका महिलेला आरोपींनी मारहाण केली. सोनी आणि त्याचे दोन मित्र (पूर्ण नाव नाही) अशी आरोपींची नावे आहेत. आधारवाडी भागात राहणाऱा देवेश अनंत लोखंडे (२०) याच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी सोनी आणि साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.