जय मल्हार विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिन
डोंबिवली : महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून रेझिंग-डेच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत डोंबिवलीत जय मल्हार विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनी रविवार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये डोंबिवलीतल्या ३९ शाळांतील १३३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात आयोजित करण्यात आलेल्या या दौडची सुरूवात सकाळी सात वाजता जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी मार्गावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोरून झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दौडला झेंडा दाखविला. यावेळी जय मल्हार विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, मनसेचे हरिश्चंद्र पाटील, अनिल वलेकर, कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कोळशेवाडी वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धकांनी पटावली बक्षीसे
३ किलोमीटर अंतरासाठी आयुष चव्हाण (टिळक नगर शाळा) नीरज राणे (डीएनसी हायस्कूल) आणि श्लोक विचारे (डॉन बॉस्को), ४ किलोमीटर अंतरासाठी नम्रता बरकडे जोशी हायस्कूल शनाया काणेकर (प्रभाकर देसाई) स्कूल आणि आरोही चव्हाण (साऊथ इंडियन स्कूल), तसेच ४ किमी अंतरासाठी तनया धुमक (ग्रीन्स हायस्कूल) आणि रश्मी पवार (गार्डियन स्कूल) या ८ विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. एक ते पाच किमी अंतरासाठी असलेली ही स्पर्धा आठ गटांमध्ये होती. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र रन देण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचा आयोजन करण्यात आले होते. दौड यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव राजेश जयस्वाल, खजिनदार लक्ष्मण फडतरे, कार्याध्यक्ष दीपक वारंग, श्रीकांत चतुर, संतोष कदम, बाळू घरत, राजू धारवणे, विनोद जैस्वाल, राजेंद्र पाटील, तानाजी आहेर, अनिल शिंदे, आनंद लाड, काशिराम साळवी, वैभव तुपे, राकेश मोरे, विनोद जयस्वाल, अनिल पाटील, गोपाळ कोचरेकर, प्रभाकर पाटील, विजय जाधव, अंबिकेश शेलार, सचिन चंदनशिवे, रमेश सुगंधी आणि यशवंत दिघे आदी पदाधिकारी व कार्यकत्यांनी अथक परिश्रम घेतले.