रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा आकडा पार केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा पार केला. ‘अॅनिमल’ने जगभरात ७०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रणबीरसोबत या चित्रपटातील बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या कामाचीही खूप चर्चा होत आहे. या चित्रपटामुळे बॉबी देओलला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बॉबीने चित्रपटातून काढून टाकलेल्या सीनबद्दल खुलासा केला आहे. बॉबीच्या या विधानावरून आपण अंदाज लावू शकतो की बॉबीचा हा सीन जर चित्रपटात घेतला असता तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणखी तीव्र झाल्या असत्या.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये विमानाच्या रनवेवर रणबीर आणि बॉबी देओल यांच्यातील फाईट सीक्वेन्स खूप गाजला आहे. या सीनमध्ये रणबीर बॉबी देओलला मारतो, पण ते दोघे भाऊ असल्याने त्यांच्या नात्याला ट्विस्ट देण्यासाठी आणि दोन भावांमधील प्रेम दाखवण्यासाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा या सीनमध्ये बॉबीला रणबीरला किस करताना दाखवणार होते. याचा खुलासा बॉबीने नुकताच एका मुलाखतीदरम्यान केला.
मीडियाशी बोलताना बॉबी म्हणाला, “या फायटिंग सीनमध्ये आम्ही किसिंग सीन देणार होतो, पण संदीपने हा किसिंग सीन चित्रपटातून काढून टाकला. तुम्हाला हा भाग बहुतांश Netflix अनकट आवृत्त्यांवर मिळू शकेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली, तरी बॉबी देओल आणि रणबीर यांच्यातील चुंबनदृश्यही घेतले असते तर चित्रपटाची टीका आणखी वाढली असती.