कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील गिरीष वाईन शॉपवर चोरट्यांनी डल्ला मारून साडेचार लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या वाईन शॉप पासून हाकेच्या अंतरावर एसीपी कार्यलय ,जुने महात्मा फुले पोलीस स्टेशन असून रात्री चोरट्याने एक्झॉस फॅन काढून त्या वाटे वाईन शॉप मध्ये घुसले

काल रात्रीच्या सुमारास दोन चोरटे या वाईन शॉपच्या मागील बाजूस असलेला एक्झॉस फॅन काढून त्यावाटे वाईन शॉप मध्ये घुसले व वाईन शॉप मधील सुमारे चार लाख 75 हजारांची रोकड लांबवली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत . याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *