प्रतिजैविक औषधासंबंधीची अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी
नवी दिल्ली : देशभरात एंटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविक औषधाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. कारण प्रतिजैविकाच्या अयोग्य वापरामुळे शरीराविरुद्ध परिणाम होऊ शकतो,अशी प्रतिजैविक औषधासंबंधीची अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
प्रतिजैविकांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.कारण प्रतिजैविकांच्या अयोग्य वापराचा परिणाम जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणालाही हानिकारक ठरू शकतो. अगदी पशुवैद्यकीय, मत्स्यपालन आणि कृषी क्षेत्रावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.