ठाणे / अविनाश उबाळे : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे नेणारा दिव्यांचा सण. पणत्यांची आरास हे दिवाळीचे एक खास वैशिष्ट्य. नरकासूर प्रतिमा दहन केल्यानंतर घरोघरी पणत्या प्रज्वलीत करूनच दिवाळीचे उत्साही स्वागत करण्यात येते. आजच्या बदलत्या युगातही पणतीचे महत्व अद्याप तरी कमी झालेले नाही. ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील कुंभार समाजाचा पारंपारिक दिवाळी उत्सवात मातीच्या पणत्या बनविण्याचा पिढीजात व्यवसाय आता संकटात आला आहे. सध्या मातीच्या पणत्या ऐवजी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर चिनी मातीच्या विविध रंगबेरंगी अशा आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध आहेत.


गुजरात राज्यातील कुंभार व्यवसायिकांनी महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भिवंडी, शहापूर येथील बाजारपेठेत आकर्षक दिसणाऱ्या रंगबेरंगी अशा लहान मोठ्या आकाराच्या पणत्या दिवाळी सणाकरीता खास विक्रीसाठी आणल्या आहेत. या पणत्यांना मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी असल्याचे या व्यवसायातील विक्रेते सांगतात लहान पणत्या ३० ते ४० रुपये डझन तर मोठ्या कलरफुल पणत्या ५० ते ६० रुपये डझन अशा प्रकारे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी दिवाळी सणात घराघरातील अंगणात, प्रवेशद्वाररोषणाईने उजळून निघायचे त्या मातीच्या पणत्या आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे दिसत आहेत. मातीच्या पणत्यांची जागा आता चिनी मातीच्या पणत्यांनी घेतली आहे असे एकंदरीत चित्र दिसत आहे.पुर्वी मातीच्या पणत्यांना जास्त मागणी असे दिवाळीच्या सणाची लगबग सुरू होताच या पणत्या मोठया मेहनतीने व कौशल्याने ग्रामीण भागातील कुंभार समाजातील कलाकार मातीच्या पणत्या घडवित असतं त्या विक्रीसाठी ग्रामीण भागातील गावा गावात तर शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणत टोपल्यात मातीच्या पणत्या ठेऊन त्या विक्रीसाठी कुंभार समाजातील विक्रेते गावोगावी फिरून पणत्या विक्री करताना दिसत या पणत्या विक्रीच्या व्यवसायातून त्यांना दिवाळीत रोजगार मिळत असे.परंतु आता गेल्या काही वर्षांपासून गुजरात राज्यातील कुंभार व्यवसायिकांनी महाराष्ट्रात पणत्या विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे.हे व्यावसायिक कुंभार पणत्या विक्रीसाठी महाराष्ट्रात येत असल्याने ठाणे जिल्ह्यातील कुंभार समाजाचा पणत्या विक्रीचा पिढीजात पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याने त्यांच्या रोजगारावर गंडांतर आल्याची खंत स्थानिक कुंभार समाजातील कलाकार व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *