ठाणे – एकीकडे माणसांमधील माणुसकी लोप पावत चालली असताना आणि माणसा- माणसातील द्वेष भावना वाढीस लागत असताना, दुसरीकडे वर्षभरापूर्वी चुकलेल्या एका श्वानाच्या मूळ मालकाला शोधण्यासाठी एक महिला आणि तिचे सहकारी मागील काही दिवस जीवाचे रान करीत आहे. माणुसकीचे दर्शन घडविणारा हा प्रकार ठाण्यात घडला आहे.

वर्षभरा पूर्वी टीकुजीनी वाडी परिसरातील एका सोसायटीत चुकून आलेल्या एका पाळीव श्र्वानाला या सोसायटीतील लोकांनी असारा दिला. आज ना उद्या त्याचा खरा मालक येऊन त्या श्वानाला घेऊन जाईल अशी त्यांची भाबडी आशा होती. मात्र आज वर्षाहून जास्त कालावधी उलटला तरी त्याचा मालक काही त्याला शोधायला आला नाही. परंतु आता या सोसायटीतील श्रीमती सुर्वे आणि मंडळींनी याच्या मूळ मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मागील एक महिन्यांपासून त्या मानपाडा आदी भागातील जवळजवळ सर्व सोसायट्या, चाळी, बंगलो पालथे घातले असून, दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणावर पॅम्पलेट देखील वाटले. मात्र अजूनही या श्र्वानाचा मूळ मालक सापडलेला नाही.
टीकुजिनी वाडी येथील एका सोसायटीत वर्षभरापूर्वी एक पाळीव कुत्रा चुकलेल्या अवस्थेत आला होता. या सोसायटीतील काही श्वानप्रेमी त्याची काळजी घेत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी जो प्राण्यांची भाषा जाणतो अशा कमुनिकेटर ला आणून या अनाहुत आलेल्या श्र्वानाविषयी जाणून घेतले. तेव्हा हा कुत्रा भटका नसून तो कोणाच्या तरी मालकीचा असून मालकासाठी त्याचा जीव झुरत असल्याचे सांगितले. तेव्हापासून श्रीमती सुर्वे आणि मंडळी जवळपास ५ किलोमीटर परिसरातील प्रत्येक सोसायटीत या कुत्र्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. परवाच त्यांनी या परिसरात येणाऱ्या वृत्तपत्रात श्र्वानाच्या फोटो छापलेले पत्रक वाटून शोध मोहीम सुरू ठेवली आहे. पांढऱ्या रंगाचा असलेल्या या कुत्र्याचे डोके ब्राऊन रंगाचे असून त्याच रंगाचा डाग त्याच्या पोटावर आहे. सदर श्र्वाणाच्या मालकाबाबत कोणाला काही माहिती समजल्यास त्यांनी संतोष – 9819264004/ 8928592203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वाट चुकलेल्या या कुत्र्याला त्याचा मूळ मालक शोधून देण्यासाठी ही मंडळी पायपीट करीत असून पदरमोड देखील करीत आहे. माणुसकी लोप पावत चाललेल्या या जगात ही बाब मनाला आनंद देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!