एसटीच्या प्रशासनावर ताण

डोंबिवली : पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होताच लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी पर्यायी सेवा म्हणून एसटी बसचा मार्ग शोधला. बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेनंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला. मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असल्याने प्रवाशी संतप्त झाले. कल्याणच्या बस डेपोवर अक्षरशः गर्दी उसळली होती. त्यामुळे एसटीच्या प्रशासनावर ताण आल्याचे दिसून आले.
    

पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळित होताच प्रवाशांकडून पर्यायी सेवेचा शोध सुरू झाला आहे. कल्याणच्या बस डेपोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी वाढत चालली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला असताना बस डेपोत सुद्धा पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कल्याण, ठाण्यासह मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटेपासूनच रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रवास करणे गरजेचे असलेल्या प्रवाशांनी रेल्वेला पर्याय सेवेचा शोध सुरू केला. बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेनंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला. मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असलेली दिसली. इतके प्रवासी अचानक आल्याने त्यांच्या सोयीसाठी बसगाड्या आणायच्या कुठून ? असा प्रश्न एसटीच्या प्रशासनाला पडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *