मंगेश तारोळे – पाटील
नवी मुंबई : खारघर येथे निरुपणकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतिने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार १६ एप्रिलला प्रदान करण्यात आला. संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट लागल्याने कार्यक्रम तसेच आयोजकांवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. या कार्यक्रमासाठी आलेल्या काही अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाला लाखो लोकांचा जनसमुदाय आला होता. मात्र, या कार्यक्रमात येण वेळी खाकी धावून आल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे चित्र यावेळी कार्यक्रमात दिसत होते. खारघरचे पोलीस पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त श्री संजय मोहिते झोन २, पंकज ढाकणे पोलीस उपआयुक्त, अमित काळे पोलिस उपआयुक्त, भागवत सोनवणे सहाय्यक पोलिस आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेजवळ, शत्रुघ्न माळी, संदिपान शिंदे, दत्तात्रय किंद्रे व पोलीस अमंलदार अंकुश तरटे, सुनिल कंणखरे, दिपक पाटील ठाणे अंमलदार, पोलिस शिपाई आदी कर्मचारी धावून आले.
या कार्यक्रम स्थळी श्री सेवकांनी मोठया प्रमाणात हजेरी लावल्यामुळे श्री सेवकांमध्ये लहान मुल, महिलांची मोठी गर्दी यावेळी येथे पाहायला मिळाली़. उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे पाणी गरज जास्त प्रमाणात भासत होती, मात्र, कार्यक्रमस्थळी गर्दी जास्त असल्याने पाणी मिळणे कठीण झाले असल्याने रस्त्यावर अनेक श्री सदस्य उन्हामुळे पाणी-पाणी करत चकर येवून पडल्याने बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिंसानी श्री सदस्यांसाठी पाणी उपलब्ध करून देत उष्मघाताने चक्कर येवून पडलेल्या श्री सदस्यांना पोलिस उपचारासाठी दाखल केल, त्यांच्या या प्रयत्नामुळे आज पुन्हा मुंबई पोलिसांवर कौतुकाचा थाप पडली.
यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते झोन २, पंकज ढाकणे पोलीस उपआयुक्त, अमित काळे पोलिस उपआयुक्त, भागवत सोनवणे सहाय्यक पोलिस आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेजवळ, शत्रुघ्न माळी, संदिपान शिंदे, दत्तात्रय किंद्रे व पोलीस अमंलदार अंकुश तरटे, सुनिल कंणखरे, दिपक पाटील आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी अनेक श्री सेवक व माताभगिनीचे प्राण वाचवले.
निरुपणकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतिने महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, याठिकाणी लाखोंच्या संख्येंने श्री भक्त आल्याने येथे कार्यक्रम स्थळी श्री सदस्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने श्री सेवक पाण्याअभावी चक्कर येवून खाली पडत होते. पाण्याअभावी मुत्यू बघुन दु:ख झाले परतु, डयुटी सांभाळून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आमच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून करण्याचा प्रयत्न आम्ही केला. यावेळी बोलतांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेजवळ, शत्रुघ्न माळी यांनी सांगितले.