डोंबिवली : महिलांच्या गळयातील मंगळसूत्र, चैन हिसकावून पळविण्याच्या घटनेत सर्वत्रच दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महिलांनी सावध राहण्याची गरज आहे. असाच एक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. घरडा सर्कलकडून के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाकडे रस्त्याने पायी जाताना एक महिलेच्या गळ्यातील ७२ हजार रूपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. रविवारी दुपारी हा प्रकार घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर भागात राहणारी ही महिला या रविवारी घरडा सर्कल येथून आपल्या मुलीसह पेंढरकर महाविद्यालयाकडे चालल्या होत्या. विजय सेल्स समोरील रस्त्यावरून जात असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील मागे बसलेल्या एकाने त्यांच्या मानगुटीवर थाप मारून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. दुचाकीस्वार पळून गेल्यानंतर वसंताकुमारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!