ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट तयार करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हे भव्य पोट्रेटचे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असून याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत हे पोट्रेट पाहण्याचा आनंद लुटावा, असं आवाहन देखील या निमित्ताने आयोजकांनी केलं आहे.
ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात १० तरुणांनी ३ दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे. सकल मराठा संस्थे मार्फत हे भव्य पोट्रेट बनवण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पोट्रेटचे मुख्य मोझॅक कलाकार हे चेतन राऊत असून त्यांनी या पोट्रोट करता ५० हजार दिव्यांचा वापर केला आहे. ज्यात हिरवा, काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे हे दिवे आहेत.
ठाण्यात प्रथमच अशा प्रकारे मोझेक प्रोट्रेट साकारण्यात येत आहे. साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मोझेक प्रोट्रेटची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये होणार असल्याचे मोझेक प्रोट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी सांगितले. यंदा कोरोना काळ असल्याने कोठेही शिवजयंती निमित्त मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे यंदा शिवजयंती साजरी करायची कशी असा प्रश्न अनेकांपुढे होता. त्याला उत्तर देत ठाण्यात तरुणांनी शिवजयंती उत्सवानिमित्त ५० हजार मातीच्या दिव्यांपासून ३० बाय ४० फूटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक प्रोट्रेट साकारण्यात आले आहे. २० फुटांवरुन सोशल मीडिया डिस्टंसिंगचे नियम पाळून नागरिकांना हे पोट्रेट पहायला मिळणार आहे.
————–