डोंबिवली, दि,11 : कल्याण होम बाबा टेकडी परिसरात दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिचे मंगळसूत्र हिसकावून एकजण पसार झाला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. महिलेले दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांचा शोध सुरु दिला होता. यानंतर दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला अमीर शेख (२९) याला वांगणी बदलापूर येथून टिळकनगर पोलीसांनी अटक केली.

6 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी कल्याणच्या होमबाबा टेकडीवरील दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने नराधम तिचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला. या प्रकरणी टिळकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीची ओळख पटवली असता आरोपी अमीर शेख असल्याचे समजले. 

अमीरच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. तब्बल दोन महिने आरोपी आमिर शेख हा पोलिसांना चकवा देत होता. अमीर हा काही दिवस अजमेरला लपुन बसला होता. टिळकनगर पोलिसांचे पथक अजेमरला गेले. मात्र तेथून अमीर निसटला. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर अमीर वांगणी बदलापूर येथे येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे टिळकनगर पोलिसांच्या पथकाने वांगणी बदलापूर परिसरात सापळा रचत आमिरला अटक केली.अमीर हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशाप्रकारे अन्य कोणते गुन्हे केले आहेत का त्याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!