ठाणे जिल्हा परिषदेवर २० वर्षांनी भगवा फडकला : एकनाथ शिंदे ठरले किंगमेकर
ठाणे : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने तब्बल 20 वर्षानंतर वर्चस्व मिळवीत भगवा झेंडा फडकवलाय. 53 पैकी 26 जागांवर शिवसेनेने दणदणीत विजय मिळवलाय. त्यामुळे ठाण्याचे शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे किंगमेकर ठरलेत. मात्र शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्या ठिकाणी भाजपचे दयानंद पाटील विजयी झालेत, त्यामुळे हा पराभव सेनेला हादरा बसणारा ठरलाय.
ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 आणि पंचायत समितीच्या 106 जागांचा निकाल.
कल्याण तालुका :
जिल्हा परिषद एकूण जागा ६ : शिवसेना ३, भाजपा ३
पंचायत समिती – एकूण जागा १२ : भाजपा ५, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३
अंबरनाथ तालुका :
जिल्हा परिषद गट – एकूण जागा ४ : शिवसेना-राष्ट्रवादी युती ३, भाजपा १
पंचायत समिती – एकूण जागा ८ : शिवसेना-राष्ट्रवादी युती ७, भाजपा १
मुुुरबाड तालुका :
जिल्हा परिषद गट – एकूण जागा ८ : भाजपा ४, राष्ट्रवादी ३, शिवसेना १
पंचायत समिती – एकूण जागा १६ : भाजपा १०, राष्ट्रवादी ५, शिवसेना १
शहापुर तालुका :
जिल्हा परिषद गट – एकूण जागा १४ : शिवसेना ९, राष्ट्रवादी ५,
पंचायत समिती – एकूण जागा २८ : शिवसेना १८, राष्ट्रवादी ६, भाजप ३, अपक्ष १
भिवंडी तालुका
जिल्हा परिषद गट – एकूण जागा २१ : शिवसेना ६, भाजप ३, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष प्रत्येकी १
पंचायत समिती – एकूण जागा ४२ : शिवसेना ११, भाजपा ११, काँग्रेस