ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक  १५ जानेवारीला 

ठाणे  : ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष  तसेच पंचायत समिती सभापती व उप सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवार १५ जानेवारी रोजी अध्यक्षपदाची निवडणूक जिल्हा नियोजन समिती सभागृह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. तर पंचायत समिती सभापतीपदासाठी त्या त्या पंचायत समिती सभागृहात ८ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी ३ वाजता या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन १५ मिनिटे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *