लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा ३ फेब्रुवारीला ठाणे दौरा
ठाणे : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या शनिवार ३ फेब्रुवारी २०१८ रोजी ठाणे येथे येत आहेत. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या वार्षिक परिषदेत महाजन उपस्थित राहणार आहेत. रेमंड्स ग्राउंड, ठाणे पश्चिम येथे दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
वक्फ न्यायाधीकरणाच्या सुनावण्या
महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी ८ आणि ९ फेब्रुवारी २०१८ रोजी ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे. जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष न्यायाधिकरण ए.ए.शहापुरे यांनी कळविले आहे.
नियोजन भवनात जागतिक पाणथळ भूमी दिन
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शुक्रवार २ फेब्रुवारी ला नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत जागतिक पाणथळ भुमी या विषयावर तज्ञाची व्याख्याने , मार्गदर्शन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धाचा बक्षीस समारंभ होणार आहे.