ठाणे – तब्बल पन्नास वर्ष शिवसेनेच्या ठाणे, मुंबई मधल्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी, ठाणे शहर उपप्रमुख, परिवहन समितीचे माजी सभापती शरद मोरे यांचे काल 14 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते.
तब्बल पन्नास वर्षे शिवसेनेची सोबत केलेले शरद मोरे प्रथम बाळासाहेब ठाकरे आणि नंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत तहहयात राहिले. दिघे साहेबांच्या पहिल्या पाच विश्वासू साथीदारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाई. अतिशय अटीतटीच्या काळात त्यांनी ठाण्याची परिवहन सेवा जिंकली होती. ते अनेक दिवस आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, सूना, नातवंड असा भला मोठा परिवार आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाणे, मुंबईतील अनेक निकटवर्तीय उपस्थित होते.