आज महाराष्ट्र बंद : ठाण्यात रेल रोकाचा प्रयत्न
ठाणे : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. आज सकाळी ठाण्यात आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पेालिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अवघ्या दहा मिनीटानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली
भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये उमटले. दगडफेक रास्ता रोको तोडफोडीचे प्रकार घडले. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याने राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय.