फेरीवाल्यांविरोधात ठाण्यात मनसेचे खळखटयाक
ठाणे : रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाईन दिली हेाती. मात्र ही डेडलाईन संपल्यानंतर शनिवारी सकाळी ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसेने खळखटयाक केले. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे.
मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘संताप मोचा काढण्यात आला हेाता. यावेळी राज यांनी 15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचा इशारा दिला होता. अन्यथा १६ व्या दिवशी खळखटयाक करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार मनसेने ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल.
This is wrong
This ri8 brooo….