ठाणे, दि १३ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ५४ हजार ८५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे पाऊण कोटी लोकांचे लसीकरण जिल्ह्यात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७५ लाख ३२ हजार ७५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५० लाख ८५ हजार ८६२ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २४ लाख ४६ हजार ८९३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ६६४ सत्र आयोजित करण्यात आले.