ठाणे दि.३: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२ वीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्हाचा निकाल ९९.८७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हात ८६ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण

ठाणे जिल्ह्यातील ८६५३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ८६४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ४१९४१ मुली तर ४४४९२ मुले उत्तीर्ण झाले

ठाणे जिल्हात उल्हासनगर मनपा क्षेत्र अव्वल

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये उल्हासनगर मनपा क्षेत्रातील ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हात उल्हासनगर मनपा क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Linkedin, pinterest आणि  YouTube  वर नक्की फॉलो, लाईक करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *