ठाणे :– राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र तरी सुध्दा ठाण्यात राजरोजपणे डान्सबार सुरू असल्याचे स्टींग ऑपरेशन एका वृत्तवाहिनीने केल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर कारवाईचे सत्र सुरू झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले. त्याचवेळी नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तसेच संबधित आर्केस्ट्रा बार अँड रेस्टोरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने १५ लेडीज बारवर कारवाई करीत सील केले. पोलिसांच्या कारवाईनंतर बुधवारी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिका-यांसह चार जणांचे निलंबन करण्यात आले आहे उत्पादन शुल्क विभागाचे बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजीने या दुययम निरीक्षकांविरोधात तर सुरेंद्र म्हस्के आणि ज्योतिबा पाटील या जवानांविरोधात निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे तसेच देान निरीक्षकांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के बी उमाप यांनी दिली आहे.
ठाण्यातील हे १५ लेडीजबार
ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीजबार सील करण्यात आले आहेत.
( सिटीझन न्यूज मराठी चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )
https://amzn.to/3rDEQu8