बिहारमधील तिहेरी खुन खटल्यातील जन्मठेपेच्या आरोपीला ठाण्यात अटक

मुंबई : बिहार येथील तिहेरी खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच जेलमधून पळालेला परजितकुमार रामबढाई सिंग वय ३९ याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून   ठाण्यात अटक केलीय.

परजित हा बिहारचा रहिवासी आहे. १९९८ साली बिहारमधील दोन महिला व एक पुरूषाचा खून प्रकरणात तो अटकेत होता. या गुन्हयात न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. मात्र त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता त्यावेळी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. बिहार येथील बक्सर जेलमध्ये तो शिक्षा भोगत होता. मात्र ३० डिसेंबर २०१६ रोजी त्याच्यासह इतर गुन्हयातील चार आरोपींनी जेलमधून पलायन केले होते. मात्र सोनू सिहं, सोनू पांडे, देवधारी राय, उपकेंद्र सहा या चौघांना पकडण्यात बिहार पोलिसांना यश आलं होत.

परजित हा मुंबई ठाण्यासह नेपाळ दिल्ली कलकत्ता गुजरात नाशिक या परिसरात लपून राहत तेथूनच तो बिहार मधील खंडणीसाठी धमकावित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हेाती. त्याच्या शोधासाठी तीन पोलीस पथकं तयार करण्यात आली होती. अखेर ४ जानेवारीला सिडको बस स्टॉप ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसारच पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या अटकेची माहिती बिहार पोलिसांना कळविण्यात आलीय. ही कामगिरी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाययक पोलीस आयुक्त गुन्हे मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक १ ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सपोनि चिवडशेट्टी, संदीप बागुल, आनंद भिलारे, वसंत शेडगे, सुभाष मोरे, अबुतालीब शेख, प्रकाश कदम, पोना संजय बाबर, संभाजी मोरे, सुनील माने, दादा पाटील, संजय दळवी, रिझवान सयद, पोशि राहुल पवार, किशोर भामरे, राम कापरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!