नव्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे : ठेकेदाराला बील देऊ नये, मनसेची मागणी
डोंबिवली : ठाकुर्ली येथे नव्या बांधलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आलय. अवघ्या आठवडाभरातच पुलावर चक्क खड्डे पडल्याचे निदर्शना आल्याने मनसेने ठेकेदाराला बील अदा करू नये अशी मागणी पालिकेकडे केलीय. विरोधी पक्षनेता मंदार हळबे, गटनेता प्रकाश भोईर आणि डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पालिका अधिकारी तरूण जुनेजा यांना निवेदन सादर केले.
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली नवीन उड्डाणपूल झालाय. या उड्डाणपुलाचे उद्घाटन न होताच नागरिकांनी तो खुला केलाय. त्यामुळे सध्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे मनसेने समोर आणलय. ठेकेदार आणि कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रकल्प अधिकारी यांचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येतेय. त्यामुळे ठेकदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी अशी मागणीहीमनसेने केलीय.