डोंबिवली: रक्षाबंधन निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना डोंबिवलीत दहा हजार महिलांनी राख्या बांधून बहीण भावाचे अतूट नात्याचा धागा बांधला.
सकाळपासून महिलांनी त्यांच्या पलावा निवासस्थानी, जाणता राजा कार्यालय, तसेच पश्चिमेला सम्राट चौकात चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात तो सण साजरा।केला.
ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलींचा त्यात सहभाग होता.
मंत्री चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून दहा हजार महिलांनी राख्या बांधल्या.
रक्षा बंधन निमित्ताने एकत्र येऊन महिलांनी प्रेमाने राखी बांधली, मी खर्या अर्थाने भाग्यवान असून एवढ्या मोठया प्रमाणात भगिनी येतात, त्यांना आपुलकी वाटते हा त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. विशेष म्हणजे वयाची पंच्याहत्तरी, लहान मुलगी देखील त्यासाठी आली हे विशेष वाटल्याची प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
मंत्री चव्हाण यांच्यावर गाणे झाले प्रसिद्ध….
यानिमित्ताने मंत्री चव्हाण यांच्या अफाट जनसंपर्क, पारदर्शी असे कार्यपद्धतीवर जनतेचा रवी दादावर जीव हाय र… हे आधारित गाणे देखील सोमवारी प्रसिद्ध झाले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
—–