केडीएमटीच्या ताफ्यात चार बसेस दाखल
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महिलाच्या सुरक्षित प्रवासासाठी केडीएमटीकडून तेजस्विनी बसेसची सुरु असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. या बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या असून सध्या या बसेसच्या परिवहन पासेसचे काम सुरु आहे .15 ऑगस्ट पासून या बसेस सेवेत दाखल होनार आहेत
: दोन दिवसापूर्वी पालिकेच्या ताफ्यात पिवळ्या रंगाच्या 27 आसनी चार तेजस्विनी बसेस दाखल झाल्या असून या बसेस परिवहन पासिंगच्या रांगेत आहेत.27 आसनी तेजस्विनी बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी डिस्प्ले, सीटमध्ये पुरेशी आरामदायक स्पेस, प्रत्येक सीट स्वतंत्र, पुढे आणि मागे चालकाच्या नियत्रणात असलेले दरवाजे, स्थानकाच्या सूचना देण्यासाठी स्पिकर यासारख्या अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहेत. या बसेसवर वाहक देखील महिलाच असून केडीएमटीकडे 15 वाहकाची फौज तैनात आहे. महिलांना गर्दीच्या वेळी घरापासून स्टेशनपर्यत प्रवास करणे जिकरीचे बनले होते. यामुळे कामावर जाणार्या महिलांना या बसेस सोयीच्या ठरणार असून सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळात या बसेस चालविल्या जातील.