मुंबई : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला व बालविकास अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत.

तमाशा फड गाजवणाऱ्या शांताबाई कोपरगावकर यांना उतारवयात दयनीय अवस्थेत असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. त्या वृताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.रुपाली चाकणकर यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे असे चाकणकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *