surendra-patil-reel-dombivli

डोंबिवली : पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवणाऱ्या डोंबिवली मधील रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्याविरोधात मानपाडा पोलिसांनी कडक कारवाई करून त्याला थेट एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
डोंबिवली मधील बांधकाम व्यावसायिक आणि रिल स्टार सुरेंद्र पाटील हा मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गेला होता. त्यावेळी तेथे अधिकारी उपस्थित नसल्याचा फायदा घेऊन त्याने थेट पोलिसांच्या खुर्चीवर बसत एक रिल शूट केले होते. इतकेच नव्हे तर ते सोशल मीडियावर पोस्टही केले होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत पोलिस कारवाईची मागणी केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या या प्रकारावर पोलिसांनी कडक कारवाई करत एक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात आधीच सात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गुन्ह्यांवरुन त्याच्यावर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे मानपाडा पोलीसांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!