कल्याण : रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील चैन हिसकावून पळून जाणाऱ्या चेतन चिंचोलकर या सराईत गुन्हेगारास कोळशेवाडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कल्याण पूर्व पावशेनगर परिसरात चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. या घटनेबाबत प्राप्त तक्रारीवरून चैन हिसकावून पसार झालेल्या चोरट्याच्या मागावर कल्याण कोळसेवाडी पोलिस होते अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. चेतन चिंचोलकर या गुंडाच्या विरोधात या अगोदर मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वडाळा क्षेत्रातून त्याला तडीपार करण्यात आले होते. सध्या तो कल्याणमध्ये आई-वडिलांकडे राहत होता. कल्याणमध्ये आल्यावर देखील त्याने चोरी करणे सुरूच ठेवलं होते.