डोंबिवली: महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामी नारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे अयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिर ते पुढील चौकापर्यन्त त्या उपक्रमाचे आयोजन केले होते, त्यात संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
त्या दोघांनीही स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात।केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून, सामाजिक बांधीलकी आणि स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी त्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता विषयाला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्म मध्ये ते स्वतः या विषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही तर त्यात सातत्य हवे, त्यातून परिसर स्वच्छता, पर्यावर राखले जावे असेही चव्हाण म्हणाले.
मंत्री चव्हाण हे आताच नव्हे तर गेली अनेक वर्षे या उपक्रमात येतात, झाडू हातात घेतात आणि त्यामुळे त्यांचे सहकारी येतात मदत करतात त्याचा आनंद असल्याचे स्वामी नारायण भक्तांनी सांगितले.
या उपक्रमात भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष, ज्येष्ठ माजी नगरसेवक विषु पेडणेकर, दिनेश गौर, मंदार हळबे, अमित कासार यांसह पक्षाचे कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.