घाटकोपरच्या खंडोबा टेकडीवर स्वच्छता अभियान

घाटकोपर ( निलेश मोरे ) पश्चिम येथील खंडोबा मंदिर अगदी प्राचीन असून प्रसिद्ध आहे . डोंगराच्या माथ्यावर असणारे हे मंदिर खंडोबाजी टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे . अनेक वर्षे या टेकडीवर जाण्यासाठी पायवाट चांगली नाही . टेकडीवर असंख्य झोपड्या वसल्याने येथील स्थानिक कचरा डोंगराच्या दुसर्या टोकावर टाकत असल्याने खंडोबा मंदिराकडे जाणारी वाट खूपच गलिच्छ आहे . खंडोबा टेकडी प्रसिद्ध असल्याकारणाने अनेक पर्यटक , प्रसिद्ध फोटोग्राफर येथे येत असतात . या हेतूने पर्यटकांना आणि नागरिकांना हि वाट सुलभ व्हावी , स्वच्छ व्हावी यासाठी एन वार्ड पालिका कर्मचारी आणि काँग्रेस मुंबई प्रदेशचे प्रतिनिधी केतन शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दिनांक 5 नोव्हेबर रोजी खंडोबाच्या टेकडीवर  स्वच्छता अभियान घेण्यात आले . कातोडीपाडा ते खंडोबा टेकडी या पाच किलो मीटर पर्यंतचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला . दर रविवारी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते खंडोबा टेकडीवर जाऊन परिसर स्वच्छ करत राहतील असे मुंबई प्रदेशचे प्रतिनिधी केतन शहा यांनी सांगितले . यावेळी टेकडी परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कचरा टाकू नका , परिसर स्वच्छ ठेवा याचे आवाहन देखील करण्यात आले .

One thought on “घाटकोपरच्या खंडोबा टेकडीवर स्वच्छता अभियान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *