डोंबिवली : बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्या  सुशीला श्रीपत कांबळे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे २ वाजता डोंबिवली येथील राहत्या घरी वृध्दापळाने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार शांताराम कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.

भगवान बुध्द आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचाराधारा त्यांच्या नसानसात भिनली होती. त्या मनमिळावू स्वभावाच्या आणि कडक शिस्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, स्नूषा नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

दिवंगत सुशीला कांबळे यांचा जलदान विधीचा कार्यक्रम रविवार १९ नोव्हेंबर रेाजी सकाळी ११ वाजता राहत्या घरी ३०३/ए विंग त्रिदेव हौ. सो. दिनदयाळ रोड, ॲक्सिस बँक  ATM जवळ, आनंद नगर, डोंबिवली पश्चिम – ४२१२०२ येथे होणार आहे. संपर्क – मो. ९३२३५८५८६८, ७०३९९३९९२८, ८१०८२०२८१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!