प्रतिकूल परिस्थितीतही शिकता येतं,  हेच त्यांनी दाखवून दिल.

देवाने या जगाची निमिती करताना प्रत्येक व्यक्तिमध्ये काहीतरी वेगळेपण दिलेले आहे. मात्र या वेगळेपणाची समज, आपल्यातील कलागुणांची ओळख आणि सामाजिक बांधिलकीचे धडे मिळविण्यासाठी गरज असते ती गुरूंची. “गुरू” हा शब्द जरी छोटा असला तरी त्यातील असलेली बांधिलकी, वैचारिक , सामाजिक जोड आणि प्रेम हे सागरा इतक मोठे आहे. म्हणूनच आयुष्यात गुरू लाभणे भाग्याचे समजले जाते. प्रत्येकाच भावविश्व ज्याच्या आजुबाजुला फिरतं अशा गुरूंबद्दल बोलावं तितक कमीचं. मात्र घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिकता येतं हेच त्यांनी दाखवून दिलय. अशाच गुरूंची ही कहाणी.

बदलापुर येथे राहणारे डॉ सुर्यकांत भोसले हे शहाड येथील देवजीभाई हरीया महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सर्वांच्याच परिचयाचे. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे आणि विद्यार्थ्यांना उच्च पदापर्यंत पोहचविण्यास धडपड करणारे अशी त्यांची ओळख. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी अनेक पदव्या मिळविल्यात हेच त्याचे मुख्य वैशिष्ट ठरलय. प्रतिकूल परिस्थितीतही आपण शिकू शकतो. फक्त आपल्याला शिकण्याची आवड पाहिजे आणि काही तरी स्वप्न उराशी बाळगल पाहिजे असे भोसले सर सांगतात. 5 नोव्हेंबर 1978 मध्ये घाटकोपर त्यांचा जन्म झाला. वडील राजावाडी रूग्णालयात नोकरीला होते. 1979 मध्ये वडीलांचे अपघातात निधन झाले. 1980 मध्ये वडीलांच्या जागेवर आईने नोकरी पत्करली. आई आणि वडील दोन्ही भूमिका बजावत. घर संभाळून नोकरी केली व आम्हाला शिक्षणही दिले. आई रूग्णालयात कामावर असल्याने मुलाने डॉक्टर व्हावे अशी तिची इच्छा होती. पण घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने डॉक्टर होण्यासाठी लागणारा खर्च झेपणारा नव्हता. त्यामुळे डॉक्टर व्हाण्याचे स्वप्न भंगले असे भोसले सर सांगतात. डॉक्टर होत येणार नसले तरी उच्च शिक्षण आपण घेऊन अशी मनात जिद्द ठेवली. त्यामुळे सायन्समधून आर्ट्सकडे प्रवेश घेतला. विक्रोळीतील एका सेंटरमध्ये संगणक प्रशिक्षक म्हणून नोकरी करीतच त्यांनी बदलापुर येथील आदर्श महाविद्यालयातून बीए चे शिक्षण पूर्ण केल.याच दरम्यान इंडोकेम येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह ची नोकरी लागली. डॉक्टर होता आले नाही याची खंत मनात होती त्यामुहे उच्च शिक्षीत होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगून विधी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले. अखेर २००६ मध्ये आंबेडकर कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 2008 मध्ये भारती विद्यापीठ पुणे येथुन एलएलएम शिक्षण पुर्ण केलं तिथे तेथून त्यांनी 3रा क्रमांक पटकावला. मात्र त्यांचा शिक्षण थांबल नाही. डॉ.हासेकर यांचा आदर्श समोर ठेवित त्यांच्या मार्गदर्शनातून नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयातून त्यांनी महिला सक्षमीकरण विषयातून पी.एच.डी पदवी मिळवली. एलएलबी करताना एक वर्ष ड्राँप लागल्याने . त्या काळात डिप्लोमा इन लेबर लाँ अँड लेबर वेल्फेअर पदवी घेतली. 2014 मध्ये अर्थशास्त्र मध्ये एम,ए. केल. 2001 ते 2006 च्या दरम्यान लिगल अँडमिनीस्ट्रेशन मधून आंबेडकर कॉलेज येथून एमबीए केलं. भोसले सरांनी अनेक पदव्या मिळवल्या. 2008 मध्ये एलएलएम पुर्ण केल्यावर साई टुर्स अँड ट्रँव्हल्समध्ये विधी अधिकारी नोकरी केली. उल्हासनगर मधील सीएचएम मध्ये असिस्टंट प्रोफेसर व आरकेटी काँलेजमध्ये बी कॉम प्रोफेसर काम पाहिलं. 2011-12 मध्ये युनियन बँकेत पहिली लोकअदालतीला भोसलेसरांकडून सुरवात करण्यात आली. विशेष म्हणजे भोसले सर हे 16 बँकांवर विधी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
2012 मध्ये कल्याण तहसील कार्यालया एका कामानिमित्त गेले असता त्याठिकाणी देवजीभाई हरिया संस्थेचे सचिव डॉ गिरीश लटके यांच्याशी त्याची ओळख झाली. भोसले सरांमधील बुध्दीमत्ता ओळखून लटके यांनी त्यांना लॉ काँलेजमधील प्राचार्य पद सांभाळण्यासाठी ऑफर केली. प्राचार्यपदासाठी कायदेशीर प्रक्रीयेचा भाग म्हणून मंत्री लक्षमणराव ढोबळे यांनी भोसले सरांना पडताळले. मात्र त्यांच्यातील कायद्यासह इतर विषयांचा दांडगा अनुभवामुळे तब्बल 7 काँलेजच्या प्राचार्य पदाची ऑफर करण्यात आली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लॉ कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या विधी शाखेत प्रवेश घेण्यासाठी सीईटी पास करणे अनिवार्य. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र विद्याथ्यांमधील संभ्रम कसा दूर करायचा त्यांना एखादा किचकट विषय सोप्या पध्दतीने कसा मांडायचा याचे कसब भोसले सरांकडे आहे. सीईटी परीक्षा आता जरी अयोग्य वाटत असली तरी भविष्याकरीता योग्यच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या वकिलांची संख्या खूप वाढली आहे. बार रूममध्ये बसायलाही जागा नसते. यामुळे प्रत्येक वकिलाकडे काम असेलच असे नाही. त्यामुळे अनेक वकिलांना कामही मिळू शकत नाही. सीईटी मुळे मर्यादित जागा होतायत हे योग्यच आहे. सीईटी परिक्षा देण्यास विद्यार्थ्यांनी घाबरू नये. चालू घडामोडीचे ज्ञान आत्मसाद करावे असाही सल्ला विद्याथ्र्यांना देतात. घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिक्षणात कोणताही खंड पडत नाही आपल्याला शिकण्याची इच्छा असेल तर आपण शिकू शकतो याचे उत्तम उदारहरण म्हणजे भोसले सर ठरले आहेत. वाढदिवसानिमित्त आम्हा विद्याथ्यांकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा
                                                                                                                                                                                                                      अनिरूध्द कुलकर्णी
                                                                                                                                                                                                                               शब्दांकन

2 thoughts on “प्रतिकूल परिस्थितीतही शिकता येतं, हेच त्यांनी दाखवून दिलं”
  1. That’s gr8🤗 nice article.

    About Bhosale Sir, Whatever said by Aniruddha is completely true.

    He is very talented person and always motivate to everyone.

    From his age of 35 yrs he is handling the level of Principal of Law College. Hat’s off to his gr8 achievement of his early age.

    Dr Suryakant Bhosale, I really appreciate you and ur achievement. I wish you all d best for your future and hope sky is d limit to grow yourself. May your all d dreams come true. Happy birthday to u Sir😊👍👏👏👏💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!