डीजिटल युगात लोककलेचे धडे
सुरेखा पुणेकराचे डोंबिवलीत मार्गदर्शन
डोंबिवली : देशाला आणि राज्याला कलेचा वारसा लाभलेला आहे. आजच्या डिजिटल युगात तरूण पिढी इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या मागे यशासाठी धडपडत आहे.त्यामुळे तरूणाईचा कल आधुनिकतेकडे वळला आहे.परंतु यात हरवत चाललेली लोकसंस्कृती, लोकपरंपरा टिकून राहण्यासाठी तसेच तरूण पिढीला लोककलांची ओळख करून देण्यासाठी,व नविन पिढीला या लोककलेचे माहिती व्हावी या उद्देशाने आराधना फाईन आर्ट अँकँडमी तर्फे डोंबिवलीत २६ ते २८आँक्टोबर २०१७ या कालावधीत डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात लावणी न्रुत्य कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध लावणी न्रुत्यांगना सुरेखा पुणेकर उपस्थित राहणार आहेत.
सुरेखा पुणेकर प्रशिक्षणार्थींना लावणी सादरीकरण,पारंपरिक ताल,लयबध्द पदन्यास आणि हस्तसंचालन इत्यादीचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रसिद्ध ढोलकी वादक जेष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र विजय चव्हाण हेही हजर राहुन मार्गदर्शन करतील. तसेच योगेश माणिकरांव चिकटगांवकर व आराधना संस्था प्रशिक्षणार्थी याना तमाशा सादरीकरणातील क्रम गण,मुजरा,गवळण,बतावणी,लावणी सादर करतील.सदर कार्यक्रमास डोंबिवतील समाजसेवक,साक्षी चँरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त समीर जगे प्रमुख पाहणे उपस्थित राहणार आहेत.